सिंदेवाहीत भीषण अपघात; एसटी बस-ट्रकच्या धडकेत २२ जण जखमी | Batmi Express

Be
0

Sindewahi,Sindewahi Accident,Sindewahi News,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Accident,Chandrapur Today,Accident,

सिंदेवाही :
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात एसटी बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तब्बल २२ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, राजुरा येथून तुमसरकडे जाणारी तुमसर आगाराची एसटी बस नागभीड–मूल मार्गावरून प्रवास करत होती. दरम्यान, सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव जाट गावाजवळील पुलावर समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकची बसला जोरदार धडक बसली. धडक इतकी तीव्र होती की बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.

अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. जखमी प्रवाशांच्या मदतीसाठी स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यानंतर पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणांनाही घटनेची माहिती देण्यात आली.

या दुर्घटनेत एकूण २२ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी १६ जणांना किरकोळ दुखापत, तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासह अपघातग्रस्त वाहनांची पाहणी केली आणि पुढील तपास सुरू केला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, चालकांचे जबाब, घटनास्थळावरील परिस्थिती आणि अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे तपास केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

 


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->