गडचिरोलीत भरदिवसा खून! उधारीच्या पैशांवरून युवकाची निर्घृण हत्या | Batmi Express

Be
0

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli Murdered,Gadchiroli Crime,muder,

गडचिरोली :
शहरातील लांझेडा परिसरात उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. जिल्हा मुख्यालयात भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव सचिन रामचंद्र कोलूरवार (रा. विवेकानंदनगर, गडचिरोली) असे असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, लांझेडा परिसरात फर्निचरचे काम करणाऱ्या काही जणांना सचिन यांनी पूर्वी काही रक्कम उधारीने दिली होती.

सदर रक्कम परत मागितल्यानंतर संबंधितांनी पैसे देण्याचे आश्वासन देत त्यांना एका ठिकाणी बोलावल्याची माहिती मिळाली आहे. सचिन पैसे घेण्यासाठी तेथे पोहोचताच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून हालचाली सुरू आहेत.

भरदिवसा घडलेल्या या हत्येमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा-सुव्यवस्थेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->