Video : ब्रम्हपुरीमध्ये अचानक पेट्रोल टंचाई ! पंपांवर नागरिकांची तुफान गर्दी… प्रशासन अलर्ट | Batmi Express

Be
0
Bramhapuri,Bramhapuri News,Bramhapuri Today,Bramhapuri Live,Bramhapuri Petrol Updates,Chandrapur,

चंद्रपूर जिल्हा | ब्रम्हपुरी

ब्रम्हपुरी शहरात आज पेट्रोल पंपांवर अचानक नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. पेट्रोल आणि डिझेल टंचाईबाबत पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी घाईघाईने वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपांकडे धाव घेतली. परिणामी, शहरातील विविध पेट्रोल पंपांवर लांबलचक रांगा लागल्या असून काही ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थितीही निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पोलिसांकडून पेट्रोल पंप परिसरात योग्य ती खबरदारी घेतली जात असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, चंद्रपूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅस यांचा कोणताही तुटवडा नाही. सर्व इंधन साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी घाबरून न जाता संयम राखावा आणि गरज नसताना इंधन साठवण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

👉 महत्त्वाचे आवाहन:

अफवांपासून दूर राहा, अधिकृत माहितीलाच विश्वास ठेवा आणि शांततेचे वातावरण कायम ठेवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->