ब्रम्हपुरी तालुक्यात बिबट्याचा थरार! एकाच दिवसात तब्बल ६ शेतकऱ्यांवर हल्ला | Batmi Express

Bramhapuri,Chandrapur,Bramhapuri News,Bramhapuri Today,Bramhapuri Live,

Bramhapuri,Chandrapur,Bramhapuri News,Bramhapuri Today,Bramhapuri Live,

ब्रम्हपुरी
: चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांनी पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील चिखलगाव आणि पिंपळगाव भोसले या गावांमध्ये बिबट्याने केलेल्या सलग हल्ल्यांत सहा शेतकरी जखमी झाले आहेत. 

ही घटना काल दुपारच्या सुमारास घडली. वैनगंगा नदीलगतच्या शेतांमध्ये शेतकरी नेहमीप्रमाणे काम करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

जखमींना तातडीने ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालय तसेच गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. बिबट्याचा शोध घेण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले असून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

दरम्यान, बिबट्या अजूनही परिसरात असल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.