गडचिरोली: ग्राम महसुल अधिकारी ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात | Batmi Express

BE PLUS Publisher
0

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Armori Crime,Armori Live,Armori,Gadchiroli Batmya,Armori News, 

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील गोठणगाव (ता. कुरखेडा) येथे कार्यरत असलेल्या ग्राम महसूल अधिकारी सुलोचना विठ्ठलराव कन्नाके (वय ३८) यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे.

सविस्तर माहिती: तक्रारदाराने आपल्या नावावर असलेल्या वनपट्ट्याच्या शेतजमिनीचा ७/१२ उतारा ऑनलाइन नोंदवण्यासाठी ग्राम महसूल कार्यालयात अर्ज केला होता. अर्जाच्या प्रक्रियेदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी काम करून देण्यासाठी ५०० रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.

२५ फेब्रुवारी २०२६ रोजी गोपनीय पडताळणी करण्यात आली. त्यानंतर २६ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलिस उपअधीक्षक विकांत सगणे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. यावेळी सुलोचना कन्नाके यांनी ५०० रुपयांची रक्कम स्वीकारताच त्यांना पथकाने ताब्यात घेतले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध अप. क्र. ४९/२०२६ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ मधील कलम ७(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष पाटील करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->