आज सकाळी सुमारे ८:३० वाजता कारमेल शाळेतील शिक्षिका ममता बांबोळे (वय ४३, रा. आयटीआय–गोकुळनगर बायपास रोड) आपल्या दुचाकीने शाळेकडे जात असताना दुर्दैवी अपघातात गंभीर जखमी झाल्या. बी फॅशन प्लाझा परिसरात, गडचिरोली–चंद्रपूर मार्गावर त्यांची स्कुटी अचानक घसरली आणि त्या रस्त्यावर पडल्या. त्याच वेळी मागून येणाऱ्या भरधाव आयशर टेम्पोच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर त्यांना तातडीने शासकीय वाहनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेऊन उपचार सुरू करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने बांबोळे कुटुंबावर शोककळा पसरली असून शिक्षण क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
गडचिरोलीत रिंग रोडची मागणी पुन्हा जोरात
गडचिरोली शहरातून चारही दिशांना जाणारी जड वाहने इंदिरा गांधी चौकातूनच मार्गक्रमण करत असल्याने शहरात अपघातांची संख्या वाढत आहे. वारंवार होणारे हे अपघात नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठे संकट ठरत आहेत.
त्यामुळे शहरात येणाऱ्या जड वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावा म्हणून गडचिरोली शहराच्या बाहेर रिंग रोड तातडीने उभारावा, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. रिंग रोड झाल्यास शहरातील अपघातांचे प्रमाण कमी होऊन वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होईल, असे नागरिकांचे मत आहे.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.