Gadchiroli Crime: वेतनामध्ये वाढीचे आमिष दाखवून लैंगिक सुखाची मागणी; महिला आरोग्य सेविकेचा आत्महत्येचा प्रयत्न | Batmi Express

Be
0

Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Crime,Gadchiroli News,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Today,

गडचिरोली :
मुलचेरा येथील एका कंत्राटी महिला आरोग्य सेविकेने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री (वय 50) यांच्याकडून होत असलेल्या मानसिक छळासह गैरवर्तनामुळे त्रस्त होऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

6 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी राहत्या घरी विष प्राशन केले, त्यानंतर त्यांना तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीची अवस्था गंभीर असली तरी सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सुमारे दोन वर्षांपासून डॉ. म्हशाखेत्री यांनी वेतनवाढीचे आमिष दाखवून संबंधित सेविकेकडे अनुचित मागण्या केल्या तसेच वारंवार मानसिक त्रास दिला. या सातत्यपूर्ण छळाला कंटाळून सेविकेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.

या घटनेनंतर 8 डिसेंबर 2025 रोजी गडचिरोली पोलीस ठाण्यात डॉ. विनोद म्हशाखेत्री यांच्याविरोधात ‘झिरो एफआयआर’ दाखल करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 75(2) आणि 78(2) अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
झिरो एफआयआर गडचिरोली येथे दाखल असली तरी पुढील तपासाची जबाबदारी मुलचेरा पोलीस ठाण्याकडे देण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे संपूर्ण आरोग्य विभागात तसेच गडचिरोली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->