चंद्रपूर: लाच प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल नंतर चंद्रपूरचे कार्यकारी अभियंता निलंबित | Batmi Express

Be
0

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News Live,

चंद्रपूर
:- जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता विवेक पेंढे यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा एका व्यक्तीकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याचबरोबर कार्यालयात सतत गैरहजेरी लावल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

विवेक पेंढे हे बांधकाम विभागात पदभार स्वीकारल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात होते. अडीच महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांनी त्यांच्या बडतर्फीची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. मात्र, त्यांनी दाखल केलेल्या याचिकेतून त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आणि काही दिवसांपूर्वीच ते पुन्हा पदावर रुजू झाले होते.

दरम्यान, पेंढे या महिन्यातच म्हणजे सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार असून, सेवाकाल संपण्याच्या तीन महिन्यांपूर्वीच त्यांच्यावर ही दुसरी वेळ कारवाई झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->