Chandrapur Hospital Closed Today: चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व खाजगी हॉस्पिटल व दवाखाने आज बंद! | Batmi Express

Be
0

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,
सर्व खाजगी हॉस्पिटल व दवाखाने आज बंद

चंद्रपूर
: महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथी पदवीधरांना सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी (CCMP) पूर्ण केल्यानंतर नोंदणीची परवानगी दिल्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) चंद्रपूर शाखेने एक दिवसाचा संप जाहीर केला आहे.

गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते शुक्रवार, १९ सप्टेंबर सकाळी ८ पर्यंत जिल्ह्यातील सर्व खाजगी दवाखाने व दवाखाने बंद राहणार आहेत.


मुख्य आक्षेप:

  1. शैक्षणिक असमानता – MBBS हा 5.5 वर्षांचा सखोल अभ्यासक्रम आहे, तर CCMP फक्त 1 वर्षाचा. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी तडजोड होणार.
  2. रुग्ण सुरक्षिततेवर धोका – अपूर्ण प्रशिक्षणामुळे चुकीचे निदान व उपचार होऊ शकतात.
  3. दुहेरी प्रणालीचा धोका – MMC ही फक्त MBBS डॉक्टरांसाठी आहे. CCMP डॉक्टरांना परवानगी दिल्यास गोंधळ वाढेल.
  4. कायदेशीर बाबी – राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमांनुसार आधुनिक औषधोपचारासाठी फक्त MBBS डॉक्टर पात्र आहेत.
  5. आंतरराष्ट्रीय दर्जा कमी होण्याची भीती – CCMP मुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय व्यवस्थेचा मानक दर्जा कमी होईल.
  6. भविष्यातील दुष्परिणाम – या निर्णयामुळे इतर पर्यायी पद्धतीच्या डॉक्टरांकडूनही अशा मागण्या वाढतील.


IMA ची मागणी:

  1. CCMP डॉक्टरांना MMC मध्ये नोंदणी देण्याचा निर्णय मागे घ्यावा.
  2. रुग्णांच्या सुरक्षेसाठी आधुनिक वैद्यकीय परवाना केवळ MBBS डॉक्टरांनाच द्यावा.
  3. ०५/०९/२०२५ रोजीचे परिपत्रक रद्द करावे.


आंदोलनाचा निर्णय :

राज्यभरात १८ सप्टेंबर रोजी २४ तास लाक्षणिक संप करून सर्व खाजगी आरोग्यसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->