सिरोंचा पुराचा इशारा
गडचिरोली: सिरोंचा परिसरासाठी पूराचा इशारा देण्यात आला आहे. वरच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी खोऱ्यातील विविध प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे.
श्रीराम सागर, निजामसागर, कडम आणि श्रीपाद येल्लमपल्ली (एसवायपी -SYP ) प्रकल्पांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. विशेषतः एसवायपी धरणातून ४ ते ५ लाख क्युसेक (११,००० ते १४,००० क्युमेक्स) पाणी टप्प्याटप्प्याने सोडले जाणार असून हे पाणी १२ ते १५ तासांत सिरोंचा भागात पोहोचण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने (IMD) तेलंगणातील गोदावरी पाणलोट क्षेत्रासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सध्या पाणीप्रवाह नदीच्या क्षमतेत असला तरी, नदीपातळीवर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.