बस्तर विभागातील इंद्रावती पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. चिंदनार येथे इंद्रावती नदी आणि तुमनार येथे दंतेवाडा नदी या दोन्ही नद्यांनी आधीच धोका पातळी ओलांडली आहे. पर्लकोटा नदीची पातळीही वाढण्याची शक्यता आहे.
भामरागड येथे पाणी पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. चिंदनार येथील पुराचे पाणी पोहोचायला साधारणपणे १२ ते १५ तास लागतात, पण रडारच्या प्रतिमांनुसार, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर आणि कांकेर यांसारख्या नजीकच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे पाणी पातळी रात्री अचानक वाढू शकते.
आवश्यक कार्यवाही
* इंद्रावती व पर्लकोटा नदीकाठी गावांतील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी.
* पाण्याच्या पातळीवर सतत लक्ष ठेवावे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.