![]() |
२६७ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा |
चंद्रपूर :- चिमूर तालुक्यातील एकात्मिक आदिवासी प्रकल्पांतर्गत चालणाऱ्या जांभुळघाट येथील आदिवासी शासकीय आश्रमशाळेत अन्नातून विषबाधेची धक्कादायक घटना घडली. शाळेतील ५३८ विद्यार्थ्यांपैकी तब्बल २६७ विद्यार्थ्यांना अन्न विषबाधा झाल्याचा आरोप आदिवासी संघर्ष समितीने केला आहे.
या घटनेत ९ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल रात्रीच्या जेवणानंतर काही विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागले. आज सकाळी रक्ताच्या उलट्या, हातापायांची सूज आणि चक्कर येणे अशी लक्षणे दिसू लागल्याने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले.
Same News in English Here: Click Here
प्राथमिक तपासात विद्यार्थ्यांना शिळे अन्न देण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, अचूक कारण शोधण्यासाठी वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. आदिवासी विकास विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुढील चौकशी सुरू केली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.