देसाईगंज : गडचिरोलीच्या अपर्णा राऊत यांना लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी विशेष आमंत्रण | Batmi Expess

Be
0

Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli live,Gadchiroli News IN Marathi,Desaiganj,Desaiganj News,wadsa,Wadsa  news,Wadsa live,Wadsa News,
कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत यांना दिल्लीचे आमंत्रण

देसाईगंज (गडचिरोली):
दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजवंदन कार्यक्रमात देशभरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सरपंचांना पंतप्रधानांच्या उपस्थितीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाते. यंदा, 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील 17 सरपंचांची निवड झाली आहे. यात सोलापूर, नागपूर, पुणे, अकोला, ठाणे, वाशिम, गडचिरोली, अहील्यानगर, गोंदिया, भंडारा, रत्नागिरी, परभणी, सातारा, अमरावती, लातूर, सांगली आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा नितीन राऊत यांची या यादीत निवड झाल्याने गाव, तालुका आणि जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने स्वच्छ भारत मिशन, घरकुल योजना, हागणदारीमुक्त मोहीम, वृक्षलागवड, जलजीवन मिशनद्वारे पाणीपुरवठा, महिलांच्या उदरनिर्वाहासाठी उपक्रम, तरुणांसाठी अभ्यासिका, आरोग्य शिबिरे अशा अनेक विकास प्रकल्पांची अंमलबजावणी केली. विविध मंत्रालयांमधून निधी मिळवून गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले.

या कार्यामुळे कोंढाळा ग्रामपंचायत ‘यशवंत’ म्हणून ओळखली जाऊ लागली असून, आता अपर्णा राऊत यांच्या कार्याचा गौरव राष्ट्रीय पातळीवर होणार आहे. लाल किल्ल्यावर त्यांचा सन्मान हा केवळ स्वातंत्र्य दिनाचा सोहळा नसून, गावाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या स्थानिक नेतृत्वाचा गौरव आहे.


Aparna Raut from Gadchiroli Invited to Red Fort Independence Day Celebration

Desaiganj (Gadchiroli):

Every year on Independence Day, village heads from across India who have made remarkable contributions to local development are invited to the Red Fort in Delhi to attend the flag-hoisting ceremony led by the Prime Minister. This year, on August 15, a total of 17 sarpanches from Maharashtra have been selected, representing districts such as Solapur, Nagpur, Pune, Akola, Thane, Washim, Gadchiroli, Ahilyanagar, Gondia, Bhandara, Ratnagiri, Parbhani, Satara, Amravati, Latur, Sangli, and Jalgaon.

From Gadchiroli district, Aparna Nitin Raut, the sarpanch of Kondhala Gram Panchayat in Desaiganj taluka, has earned this honour. Under her leadership, the village has made significant progress through initiatives such as the Swachh Bharat Mission, housing schemes for the underprivileged, open-defecation-free campaigns, tree plantation drives, water supply solutions under the Jal Jeevan Mission, livelihood programs for widows and destitute women, study halls for youth, and health camps benefiting hundreds of villagers. She has also secured funds from various ministries to further the village’s growth.

Due to these efforts, Kondhala Gram Panchayat is now recognised as a ‘Yashwant’ model village. Aparna Raut’s invitation to the Red Fort is not only a celebration of Independence Day but also a national recognition of leaders who bring transformative change to their communities.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->