Seven Sister Hills: अतिवृष्टीमुळे सातबहिणी डोंगर पर्यटनस्थळ तात्पुरते बंद | Batmi Express

सातबहिणी डोंगर,Seven Sister Hills,Talodhi,Talodhi Live,Talodhi News,Nagbhid,Nagbhid News,Nagbhid Live,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,

सातबहिणी डोंगर,Seven Sister Hills,Talodhi,Talodhi Live,Talodhi News,Nagbhid,Nagbhid News,Nagbhid Live,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,

चंद्रपूर : जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील एक अत्यंत प्रसिद्ध व निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणजे सातबहिणी डोंगर. हे स्थळ पेरजागड व सोनापूर या गावांच्या सान्निध्यात वसलेले असून, दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात. मात्र सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे, सुरक्षिततेच्या दृष्टीने हे ठिकाण तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

सातबहिणी डोंगर हे ठिकाण तळोधी (बा.) पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येते. या परिसरात सलग काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा, झाडे कोसळण्याचा किंवा रस्ते वाहून जाण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. संभाव्य अतिवृष्टीमुळे पर्यटनस्थळी जाणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे चंद्रपूर पोलिस व प्रशासनाने पुढील आदेश येईपर्यंत सातबहिणी डोंगर परिसर पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नागरिकांनी आणि पर्यटकांनी प्रशासनाच्या या निर्णयाचा सन्मान करून सहकार्य करावे, तसेच स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी ओळखून अशा ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Seven Sister Hills Tourist Spot Temporarily Closed Due to Heavy Rainfall:


Chandrapur: The well-known tourist destination Satbahini Dongar, located in the Nagbhid taluka of Chandrapur district, near the villages of Perjagadh and Sonapur, has been temporarily closed due to continuous heavy rainfall in the region. This precautionary measure has been taken by the local administration to ensure public safety.

This picturesque location falls under the jurisdiction of the Talodhi (Ba.) Police Station. Due to the persistent downpour over the past several days, there is a heightened risk of landslides, falling trees, and road washouts in the hilly terrain. In light of these potential hazards, authorities have taken the decision to temporarily restrict public access to avoid any untoward incidents or possible loss of life and property.

According to alerts issued by the Meteorological Department, the region is currently under Orange and Red alerts during the monsoon period, indicating the possibility of extreme rainfall. Keeping tourist safety as the top priority, the Chandrapur district administration

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.