भंडारा (Gosikhurd Flood): गोसीखुर्द धरणाच्या (Bhandara Gosikhurd Dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणाचे 33 पैकी 3 गेट 1.5 तरउर्वरित 30 गेट 1 मीटरने उघडण्यात आले असून धरणातून 7353 क्युमेक्स विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सुरूच आहे. त्यामुळे विहित पाणी पातळी राखण्यासाठी आज दिनांक 28/07/2024 रोजी सकाळी 07:00 वा. गोसीखुर्द प्रकल्प स्थळावरुन प्राप्त माहिती नुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे धरणातील विसर्ग वाढवून 7353 क्युमेक्स (2,59,669 क्यूसेक्स) करण्यात आलेला आहे. Inflows नुसार विसर्ग मध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
पाण्याच्या विसर्ग सुरूच आहे याची माहिती सध्या आम्हाला मिळाली आहे. तरी नदीपात्रात आवागमन करू नये व नदीकाठावरील गावकऱ्यांनी विशेष खबरदारी बाळगावी व सतर्क राहावे. संबंधित प्रशासन यंत्रणेने दक्ष राहावे व आपल्या स्तरावरून संबंधितास तसे अवगत करावे, ही विनंती.
Read Also: ब्रम्हपुरी : लाडज गावाच्या भोवताल महापूर, डोंगा प्रवास बंद तर प्रशासन अलर्ट
वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याने नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी व सतर्क राहावे. नदीपात्रात अवागमण करु नये ही विनंती. - जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष