Chandrapur Suicide: सावलीत २० वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या; गावात शोककळा | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Suicide,Sawali,Chandrapur Crime,Sawali Suicide,Sawali News,

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Suicide,Sawali,Chandrapur Crime,Sawali Suicide,Sawali News,
२० वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

सावली (प्रतिनिधी):
सावली तालुक्यातील गेवरा खुर्द (ता. सावली) येथील एका २० वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. मृत तरुणाचे नाव वंश विजय चौधरी (वय २०) असे असून, तो घरात एकटाच असताना त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

शनिवारी त्याचे पालक शेतावर गेले होते. घरात कुणीच नसल्याचा फायदा घेत वंशने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सावली ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

वंश हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


20-Year-Old Youth Dies by Suicide in Sawli; Village in Mourning:

Sawli (Correspondent): A tragic incident took place in Gewra Khurd village of Sawli taluka, where a 20-year-old youth allegedly died by suicide by hanging himself inside his home. The deceased has been identified as Vansh Vijay Choudhary (age 20), a resident of Gewra Khurd. The incident came to light on Saturday.

According to reports, Vansh was alone at home as his parents had gone to work in the fields. Taking advantage of the solitude, he ended his life. Upon receiving the information, Pathri police reached the spot, conducted a preliminary investigation (panchnama), and sent the body to Sawli Rural Hospital for postmortem.

Vansh was the only son of his parents. His sudden death has cast a pall of gloom over the entire village. The reason behind the suicide is still unknown.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.