जुलै ३१, २०२५
0
प्रतिनिधी / भंडारा : गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाला ४२ वर्षे पूर्ण होऊनही नागपूर, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांतील अनेक प्रकल्पग्रस्त नागरिक अद्यापही त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत. सध्या तब्बल २,५५३ प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन प्रलंबित असून, शासनाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे.
या पार्श्वभूमीवर नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी मंगळवार, २९ जुलै रोजी नागपूर येथे विशेष बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जाणार असून, त्यावर उपाययोजना सुचवून संबंधित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवले जाणार आहेत.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.