Shivshahi Bus Accident News: शिवशाही बस अपघात; 11 मृतकांपैकी 9 मृतांची ओळख पटली | Batmi Express

Shivshahi Bus Accident News,Shivshahi Bus Accident,Shivshahi Bus Accident Live News,Shivshahi Bus Accident Today News, Gondia,Gondia News,Gondia Accid

 

Shivshahi Bus Accident News,Shivshahi Bus Accident,Shivshahi Bus Accident Live News,Shivshahi Bus Accident Today News, Gondia,Gondia News,Gondia Accident,Sadak Arjuni,Arjuni,

गोंदिया:- गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील सडक अर्जुनी (Sadak Arjuni) तालुक्यात झालेल्या शिवशाही (Shivshahi Bus Accident) बस अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू (11 Passengers Dead) झाला आहे. मृतकांमध्ये एक महिला पोलीस कर्मचार्याचा देखील समावेश आहे. तर 3 लोक गंभीर आणि 26 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. यातील सर्व जखमींवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या उपचार सुरू आहे. 11 मृतकांपैकी 9 मृतांची ओळख पटली असून अन्य 2 मृतकाची ओळख अद्यापही पटलेली नाही.

या अपघाताच्या बातमीने राज्यासह देशभरातून प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक वक्त करत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर अपघाताची बातमी समजताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची यांची मदत देण्याचे आदेश परिवहन प्रशासनाला दिले आहे. तसेच स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती ही मुख्यमंत्र्यांनी घेतली असून जखमींना तातडीने आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना ही दिल्या आहेत.


11 मृतकांपैकी 9 मृतांची ओळख पटली

  • 1) स्मिता सूर्यवंशी (32) रा. मोरगाव अर्जुनी (पोलीस कर्मचारी)
  • 2) मंगला राजेश लांजेवार (60) राहणार पिपरी जिल्हा भंडारा
  • 3) राजेश देवराम लांजेवार राहणार पिपरी जिल्हा भंडारा
  • 4) कल्पना रविशंकर वानखेडे (65) राहणार वरोरा जिल्हा चंद्रपूर..
  • 5) रामचंद्र कनोजे (65) राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा..
  • 6) अंजिरा रामचंद्र कनोजे (60) राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा
  • 7) आरिफ अजहर सय्यद (42) राहणार घोटी गोरेगाव गोंदिया
  • 8) अजहर अली सय्यद (55) राहणार घोटी गोरेगाव गोंदिया
  • 9) नयना विशाल मिटकरी (35) राहणार बेसा जिल्हा नागपूर
  • 10) अनोळखी पुरुष
  • 11) अनोळखी पुरुष

शोक वक्त करत मृतांना श्रद्धांजली अर्पण:


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.