वडसा: अज्ञात व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या… | Batmi Express

Be
0
wadsa,Wadsa  news,Wadsa Crime,Wadsa Suicide,Desaiganj,Suicide,
शिवराजपुर-उसेगाव शेतशिवारातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

वडसा 
(गडचिरोली):- वडसा तालुक्याच्या शिवराजपुर-उसेगाव शेतशिवारातील कुसुम येलतुरे यांच्या शेताजवळ एका अज्ञात इसमाने गळफास घेऊन आत्महत्या  (Wadsa Suicide) केल्याची घटना आज,शनिवारी 19 ऑक्टोंबरच्या दुपारी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Wadsa Suicide | Desaiganj Suicide)
 
मिळालेल्या माहितीनुसार, शिवराजपुर-उसेगाव शेतशिवारातील कुसुम येलतुरे यांच्या शेताजवळील एका झाडाला अज्ञात इसमाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली आहे. अनोळखी व्यक्तीचे अंदाजे वय (30 वर्षे ) असाव. गळफास (Suicideघेतलेल्या अज्ञात इसमाने अंगात पांढऱ्या रंगाची टी-शर्ट व निळ्या रंगाचे जीन्स पँट घातलेले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर व्यक्तीची ओळख अजून पर्यंत पटलेली नसून इसमाच्या पँटच्या खिशात केवळ गुटख्याची पुडी मिळाली असल्याचे बिट अंमलदार मदन मडावी यांनी सांगितले. सदर व्यक्तीने आत्महत्या का केली व ती व्यक्ती कुठली आहे; या बाबत पोलिसांनी तपास केला असता अद्याप कुठलाही सुगावा हाती लागलेला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->