चंद्रपूर: जंगलात गेलेल्या महिलेला वाघाने केले ठार | Batmi Express

Sawali,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Sawali News,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Tiger Attack

Sawali,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Sawali News,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Tiger Attack,


चंद्रपूर :- सावली तालुक्यातील निलसनी पेडगाव गावानजीक जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने अचानक हल्ला करून जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव रेखाबाई मारोती येरमलवार  (५५) असं आहे.  ही महिला शुक्रवारला ११ वाजताच्या सुमारास झाडण्या कापण्यासाठी जंगलात गेली होती. नाल्याजवळ झाडण्या कापत असतात दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. यात रेखाबाई जागीच ठार झाल्या. आई घरी पोहचवली नाही म्हणून मुलगा महादेव येरमलवार, राकेश येरमलवार व गावकरी नागरिक यांनी शोध घेतला, पण कुठेही दिसून आली नाही.

शनिवारी पुन्हा सकाळी वनविभागाने कर्मचारी व गावकऱ्यांसह शोध घेतला असता रेखाबाईचा मृतदेह जंगलात आढळला. मृत महिलेल्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी व वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी गावकरी नागरिकांकडून केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.