भंडारा: गोसीखुर्द धरणाच्या (Bhandara Gosikhurd Dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणाचे 33 पैकी 19 गेट 2.5 मी. तर 14 गेट 2 मी. उघडण्यात आले असून धरणातून आवश्यकते नुसार टप्प्याटप्प्याने विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सुरूच आहे. सध्या वैनगंगा नदी धोका पातळीवर आहे .शहरातील मार्ग आणि अनेक तालुक्यातील काही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मात्र दुपार पर्यन्त वाहतूक पुनः सुरू होईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पाण्याच्या विसर्ग सुरूच आहे याची माहिती सध्या आम्हाला मिळाली आहे. तरी नदीपात्रात आवागमन करू नये व नदीकाठावरील गावकऱ्यांनी विशेष खबरदारी बाळगावी व सतर्क राहावे. संबंधित प्रशासन यंत्रणेने दक्ष राहावे व आपल्या स्तरावरून संबंधितास तसे अवगत करावे, ही विनंती.
नोट :
- विसर्ग हळू हळू कमी केल जात आहे.
- पुर कमी होत आहे.
- पुर कमी होत असेल म्हणजे विसर्ग बंद होत अस नाही आहे.
नोट : बातमी लेखनात बदल चालूच राहणार - वाचकांनी AI चा वापर सुद्धा करांव. : क्लिक मी
सूचना : सध्या गोसीखुर्द चे 33 दरवाजे उघडले असल्याची माहिती आली.
प्रशासनाचे अलर्ट: आपल्या जिल्ह्यातील वैनगंगा नदी पात्रात गोसीखुर्द धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क आणि सुरक्षित राहावे. संपर्क १०७७
नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये- जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन बातमी एक्सप्रेस टीम सर्व जिल्ह्यातील वाचकान करीत आहे.