गडचिरोली :- दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे आज,11सप्टेंबर ला दुपारी 3.30 वाजे पर्यंत जिल्ह्यातील 10 मार्ग अद्यापही बंद स्वरूपात असल्याने सदर मार्गाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा वापर करून आवागमन करावे; असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
ही मार्ग बंद:
- आलापल्ली भामरागड रस्ता राष्ट्रीय महामार्ग (पर्ल कोटा नदी),ता.भामरागड
- गडचिरोली आरमोरी रा.म.क्र.३५३ सी वरील (पाल नदी)
- गडचिरोली चामोर्शी रा.म.क्र.३५३ सी वरील (शीवनी नदी)
- अहेरी देवलमारी मोयाबिनपेठा रस्ता राज्यमार्ग (वट्रा नाला) ता.अहेरी
- आरमोरी रामाळा रस्ता (गाढवी नदी) ता. आरमोरी
- भेंडाळा गणपुर बोरी रस्ता (हळदीमाल नाला)तालुका चामोर्शी
- शंकरपूर हेटी मार्कंडादेव फराळा घारगाव दोडकुली रस्ता (मार्कंडादेव जवळील नाला) तालुका चामोर्शी
- शिवराजपुर फरी किन्हाळा मोहटोळा रस्ता
- आरमोरी ठाणेगाव रस्ता
- आमगाव-सावंगी वळणमार्ग