सुरबोडी : आधुनिक किसान शिक्षण संस्थेचे मुख्य संस्थापक सचिव दलित मित्र श्रीरामजी धोटे साहेब यांच्या जयंतीचा कार्यक्रम आज दिनांक 11 सप्टेंबर 2024 ला कर्मवीर कन्नमवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय सुरबोडी येथे साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य गंगाधरजी पिलारे सर यांनी सर्वप्रथम स्वर्गीय श्रीरामजी धोटे साहेब यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले सोबतच आधुनिक किसान शिक्षण संस्थेच्या सदस्य तथा विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका कु. ज्योती राऊत मॅडम यांनी सुद्धा स्व.श्रीरामजी धोटे साहेब यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाप्रसंगी स्व. श्रीरामजी धोटे साहेब यांची कनिष्ठ कन्या कु.भारती मॅडम यांनी सुद्धा पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले .या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री कराळे सर यांनी धोटे साहेबांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमाला कर्मवीर कन्नमवार विद्यालयाचे सर्व शिक्षक कर्मचारी वृंदांनी स्वर्गीय श्रीरामजी धोटे साहेबांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी मा. पिलारे सर यांनी स्वर्गीय श्रीरामजी धोटे साहेब यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना , दिनदुबळ्यांसाठी शिक्षणाबद्दलची तळमळ धोटे साहेबांच्या मनात होती आणि म्हणूनच त्यांनी आपल्या परिसरात हे विद्या मंदिर उभे केले असे प्रतिपादन केले . या कार्यक्रमाचं संचालन प्रा.श्री.संदीप ढोरे सरांनी केले तर आभार श्री सुनील बगमारे सरांनी मानले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
दलीत मित्र स्व.श्रीराम धोटे साहेबांची क.क.विद्यालय सुरबोडी येथे जयंती साजरी | Batmi Express