Humanitarian Excellence Award 2024: स्वप्नील शिवराम कुमरे यांना सर्वोत्कृष्ट सामाजिक उद्योजक श्रेणी अंतर्गत मानवतावादी उत्कृष्टता पुरस्कार | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli Today,Gadchiroli live,Gadchiroli News IN Marathi,Best Social Entrepreneur,Swapneel Shivram Kumare

गडचिरोली येथील आदिवासी मानुस स्वप्नील शिवराम कुमरे यांना नवी दिल्ली येथे वर्षातील सर्वोत्कृष्ट सामाजिक उद्योजक श्रेणी अंतर्गत मानवतावादी उत्कृष्टता पुरस्कार २०२४ (Humanitarian Excellence Award 2024 )  मिळाला.  जागतिक मानवतावादी दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त आय कॅन फाउंडेशनतर्फे राष्ट्र उभारणीसाठी समाजात योगदान देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी पुरस्कार दिले जातात. स्वप्नील शिकवण एनजीओ चा संस्थापक म्हणून तो वंचित आणि आदिवासी समाजासाठी प्रोजेक्ट राबवतो. गडचिरोली जिल्हा जो भारतातील नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यांच्या प्रकल्पामुळे काही विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या आणि काहींना प्रतिष्ठित संस्थेत उच्चतर शिक्षण मिळाले. (Best Social Entrepreneur )

  तो आणि त्याची शिकवन टीम केवळ ऑफलाइनच नाही तर ऑनलाइनही काम करते, जिथे तळागाळातील शाश्वत आणि प्रगतीशील विकासासाठी काम करतात.स्वप्नील म्हणाला याचे सर्व श्रेय माझ्या कुटुंबाला आणि गुरु डॉ. शिरसाठ सरांना जाते ज्यांनी मला दिशा दिली.यामुळे मी माझ्या कारकिर्दीत प्रगती करत आहे.आणि शेवटी सर्व शिकवण टीमचे आभार.

 चांगल्या टीमवर्कमुळे हा शिकवण प्रकल्प काम करतो. स्वप्नील म्हणाला की काही समस्या अजूनही सुटल्या नाहीत, तो आणि त्याची टीम काम करेल.  नजीकच्या भविष्यात  निश्चितपणे वंचित आणि आदिवासी मुलांना याच फायदा मोठ्या प्रमाणत होईल.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.