Lightning Strike: वीज कोसळून शेतकरी ठार | Batmi Express

Be
0

Chandrapur,Chandrapur Lightning Strike,Lightning Strike,Sawali,Sawali Lightning Strike,Sawali News,

सावली:-
 आपल्या शेतातील कामे आटोपून घराकडे येणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना दिनांक 15 ऑगस्टला सायंकाळी 5 ते 6 वाजता च्या दरम्यान घडली.

सावली तालुक्यातील गेवरा बुज येथील शेतकरी विनोद आत्माराम वाकडे वय 36 वर्ष हा आपल्या शेतातील कामे आटपून शेतातून वापस येत असतानाच त्याच्या अंगावर अचानक वीज पडल्याने तो ठार झाला. काल सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात या परिसरात विजेचा कडकडाट झाला होता आणि काही वेळातच एक युवक गोसेखुर्द च्या नाल्याजवळ पडला असल्याची माहिती गावाकऱ्यांना मिळाली.

शिवसेना सावली तालुका प्रमुख लीलाधर चुधरी यांनी या संदर्भात प्रशासनाला माहिती दिली. तसेच पाथरी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी येऊन पंचनामा केला. एक चांगला युवक शेतकरी मरण पावल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी केरोडा येथे विजे मुळे महिला ठार झाली होती आणि काल ही घटना झाल्याने शेतकरी भयभीत झाले आहे.
या घटनेत ठार झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी गावचे माजी सरपंच तिलक वाढणकर यांनी प्रशासनाकडे केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->