आज 15 ऑगस्ट 2024 , कर्मवीर कन्नमवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय सुरबोडी येथे 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य सन्माननीय गंगाधरजी पिलारे सर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. (Independence Day)
या कार्यक्रमाप्रसंगी आधुनिक किसान शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा ज्येष्ठ शिक्षिका कु. राऊत मॅडम, माजी प्राचार्य मा.कऱ्हाडे सर ,श्री दोनाडकर सर ,श्री ठाकरे जी, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी ,आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते .मा.पिलारे सर यांनी उपस्थित सर्वाना 78 व्यां स्वतंत्रादिनाच्या शुभेछ्या दिल्या व स्वातंत्र्याचे महत्व पटवून दिले .कू.राऊत मॅडम यांनी आपण भाग्यशाली आहोत की आपण सर्व स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत हा स्वतंत्र चिरंतन काळ असच टिकून ठेवण्याची जिम्मेदारी आपणा सर्वांची आहे असे प्रतिपादन केले .तर कऱ्हाडे सरांनी सुध्धा स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विद्यार्थ्याना आपल्या भाषांतून सांगितले ,विद्यालयातील वर्ग 8,9,10,12,वीच्या अनेक विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने स्वातंत्र्य दिनाबद्दल भाषण दिले.