भंडारा: गोसीखुर्द (Bhandara Gosikhurd Dam) धरणाचे 33 पैकी 27 गेट 0.5 म्हणजे अर्ध्या मीटरणे उघडण्यात आले असून 1 लाख 71 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुपारी 03:00PM वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलं आहे.
गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून आवश्यकते नुसार टप्प्याटप्प्याने 1 लाख 71 हजार क्युसेक पर्यंत विसर्ग सोडण्यात येईल. तरी नदीपात्रात आवागमन करू नये व नदीकाठावरील गावकऱ्यांनी विशेष खबरदारी बाळगावी व सतर्क राहावे. संबंधित प्रशासन यंत्रणेने दक्ष राहावे व आपल्या स्तरावरून संबंधितास तसे अवगत करावे, ही विनंती.
सूचना : सध्या गोसीखुर्द चे 27 दरवाजे उघडले असल्याची माहिती आली. आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे. असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
प्रशासनाचे अलर्ट: आपल्या जिल्ह्यातील वैनगंगा नदी पत्रात गोसीखुर्द धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क आणि सुरक्षित राहावे. संपर्क १०७७
गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होईल. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये- जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.