Chandrapur Heavy Rain: आज 27 जुलै ला शाळा-महाविद्यालयला सुट्टी! | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Flood,Chandrapur Today,Chandrapur Flood 2024,

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Flood,Chandrapur Today,Chandrapur Flood 2024,

चंद्रपूर:-
 चंद्रपूर जिल्ह्यात गत आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून काही तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच भारतीय हवामान खात्याने शनिवार दि. 27 जुलै रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असून काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये आणि महाविद्यालये तसेच खाजगी कोचिंग क्लासेस 27 जुलै 2024 रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहे. 
Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Flood,Chandrapur Today,Chandrapur Flood 2024,


जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये व अतिवृष्टीमुळे शालेय विद्यार्थ्यांवर कोणताही परिणाम होऊ नये, याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये व महाविद्यालये तसेच खाजगी कोचिंग क्लासेस यांना 27 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे व सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172 - 250077 तसेच 07172 -272480 या क्रमांकावर संपर्क करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.480

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.