Murder News: सैराटची पुनरावृत्ती! मुलीने केला आंतरजातीय विवाह, सासऱ्याने जावयालाचं संपवलं | Batmi Express

Be
0

Chhatrapati Sambhajinagar,Chhatrapati Sambhajinagar Live,Chhatrapati Sambhajinagar News,Chhatrapati Sambhajinagar Today,

छत्रपती संभाजीनगर:- 
आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील व चुलत भावाने जावयावर चाकूने भोसकून संपवल्याची संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील इंदिरानगरमध्ये ही घटना घडली. लग्नं नंतर केवळ तीनच महिन्यात ही घटना घडल्याने परिसरात शोकाकुल वातावरण आहे. या प्रकरणी मुलीचे वडील आरोपी गीताराम किर्तीशाही आणि मुलीचा चुलत भाऊ आप्पासाहेब किर्तीशाही यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या दोघेही फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अमित साळुंखे याचे त्याच्या बाल मैत्रिणी सोबत प्रेमसंबंध होते. मात्र दोघांचा धर्म वेगळा असल्याने दोघांच्याही घरच्यांकडून या लग्नाला विरोध होता. मात्र घरच्यांच्या विरोधाला डावलून अमित व विद्या यांनी एप्रिल महिन्यात पळून जाऊन लग्न केले. काही दिवसांनी अमितच्या कुटुंबीयांनी दोघांना स्वीकारल्याने 2 मे रोजी ते घरी परतले. मात्र, विद्याच्या कुटुंबातील सदस्यांनी दोघांनाही स्वीकारले नव्हते. याउलट विद्याचे वडील आणि चुलत भाऊ अमितला जीवे मारण्याची धमकी देत होते.

शेवटी 14 जुलै रोजी विद्याचे वडील आणि चुलत भावाने संभाजी नगरच्या इंदिरानगरमध्ये दोघांनी आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून अमितवर चाकूने गंभीर वार करून हत्येचा प्रयत्न केला. या घटनेत अमित गंभीर रित्या जखमी झाला होता. त्याच्या पोटात व छातीत खोलवर वार झाल्याने गंभीर अवस्थेत त्याला घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, 12 दिवसानंतर अमितशी मृत्यूशी सुरू असलेली झुंज गुरुवारी उपचारादरम्यान अमितचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->