वडसा (गडचिरोली) :- कोरची तालुक्यातील जामणारा येथील बंधाऱ्याच्या खोदकामाचे काम आटोपून कोटगुल येथील तलावाचे खोदकाम करण्याकरिता ट्रकमध्ये पोकलैंड घेऊन जात असतांना छत्तीसगढ राज्याच्या पाटणखास गावाजवळ ट्रक मध्ये ठेवलेल्या पोकलैंडला कमी उंचीच्या 11 केव्हीचे तार लागुन दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता चेतनने ओल्या बांबुने जीवंत वीजेच्या ताराला वर उचलण्याचा प्रयत्न केला असता बांबु ओला असल्याने वीजेचा शॉक लागुन बेशुद्ध पडला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सोबत असलेल्या लोकांनी चेतनला तात्काळ उपचारा साठी कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी वडसा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. दरम्यान कुरखेड्यावरून वडसाकडे नेत असतांना चेतनने वाटेतच दम तोडला. सदरची घटना काल,17 मे रोजी सकाळी 11वाजताच्या सुमारास घडली.चेतन शंकर आदे वय 25 वर्षे असे मृतकाचे नाव असून तो वडसा तालुक्यातील गांधीनगर येथील रहिवासी आहे.