SSC Result 2024: गडचिरोलीत दहावीच्या परीक्षेत मुलींनीच मारली बाजी | Batmi Express

SSC Result 2024,SSC 2024 Result,SSC 2024,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Today,Gadchiroli live,Gadchiroli News IN Marathi,

SSC Result 2024,SSC 2024 Result,SSC 2024,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Today,Gadchiroli live,Gadchiroli News IN Marathi,

गडचिरोली :
 बारावीपाठोपाठ दहावीच्या परीक्षेत यंदाही मुलांच्या तुलनेत मुलीच सरस ठरल्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल २७ मे संकेतस्थळावर दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर केला.

जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.६७% इतका लागला असून यंदा गतवर्षीच्या तुलनेत टक्का वाढूनही नागपूर विभागात मात्र चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये दहावीची परीक्षा घेतली होती. जिल्ह्यातून १४ हजार ३०५ विद्यार्थी (मुले ७ हजार ३९७ व मुली ६ हजार ९०८ प्रविष्ठ होते. यापैकी प्रत्यक्षात ७ हजार २०४८ मुले व ६ हजार ७७७ मुली अशा एकूण १४ हजार २५ जणांनी परीक्षा दिली होती. यातील १३ हजार २७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ६ हजार ७३३ मुले व ६ हजार ५४५ मुलींचा समावेश आहे. 

मुलांच्या उत्तीर्णतेचा टक्का ९२.८९ तर मुलींचा ९६.५७ इतका आहे. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल सरासरी ९२.५२% इतका होता. टक्का कमी असतानाही गडचिरोली जिल्ह्याने विभागात तृतीय स्थान पटकावले होते. यंदा जिल्ह्याने सरासरी ९४.६७% गुण मिळवूनही विभागात चौथ्या स्थानी घसरण झाली.

वर्षनिहाय निकाल -

  • २०२२ ९५.६२
  • २०२३ ९२.५२
  • २०२४ ९४.६७

नागपूर विभागात रिपीटरच्या उत्तीर्णतेत गडचिरोली जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.