ब्रम्हपुरी 27/05/24: दहावीचा निकाल सोमवारला जाहीर झाला.परीक्षेत आधुनिक किसान शिक्षण संस्था ब्रम्हपुरी द्वारा संचालीत कर्मवीर कन्नमवार विद्यालय सुरबोडी ने दरवर्षीच्या यशाची परंपरा कायम राखत या वर्षी सुद्धा 97.40% टक्के निकाल दिला आहे.विद्यालयातून कुणाल अशोक ठेंगरे हा विद्यार्थी 86.20% प्रथम , कू.अंकिता प्रेमपाल ढवळे ही-83.80 टक्के द्वितीय आली,तर कु.साक्षी विजय तलमले- 82.80 टक्के गुणासह तृतीय आली शाळेतून एकूण 79 मुले परीक्षेला बसले होते त्या पैकी 77 मुले उत्तीर्ण झाले एकूण निकालात प्राविण्य श्रेणीत ,बरेच विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेआहेत.या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या स्वगृही जाऊन अभिनंदन करण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे आधुनिक किसान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष :आदरणीय श्री.पुं.ही.धोटे साहेब ,सचिव :आर. एस.धोटे साहेब ,उपाध्यक्ष :श्री.देसाई साहेब सहसचीव: श्री.मोरेश्वरजी भावेसर,कोषाध्यक्ष : श्री.बी.पी.मैंद साहेब ,संस्थेचे सर्व आदरणीय सदस्यगण तथा मुख्याध्यापक प्राचार्य श्री. गंगाधरजी पिलारे सर, कु.ज्योती राऊत मॅडम कु.भारती मॅडम श्री.बगमारे सर, मेश्राम सर,राणे सर ,उईके सर, माकडे सर प्रा.संदीप ढोरे सर, प्रा.राजू कार सर,प्रा.राजेंद्र देसाई सर तथा शिक्षकेत्तर कर्मचारी श्री.कराणकरजी,श्री.मुलतानेजी , श्री हेडाऊजी यांनी कौतुक केले.