⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Couple Murder: अन् त्या प्रेमीयुगुलांचे मृतदेह आढळले | Batmi Express

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Today,Chandrapur Murder,Pombhurna,Pombhurna Live,Pombhurna News,

पोंभूर्णा:- 
दिड वर्षांपासून प्रेमाच्या आणाभाका घेतलेले दोन्ही विवाहीत प्रेमीयुगुलांचे अखेर शेतशिवारात संशयितरित्या मृतदेह सापडले. सदर घटना दि.२७ मे सोमवारला सात वाजताच्या सुमारास निदर्शनास आली. रुपेश मधुकर मिलमिले वय (३२), रा. चिंतलधाबा, व शशिकला खुशाब कुसराम वय (२७) रा. भटारी असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगलाचे नाव आहे.

भटारी येथील शशिकला कुसराम हि आपल्या नवऱ्यापासून विभक्त राहत होती. तर रुपेश ने दिड वर्षांपुर्वी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. रुपेश भाजीपाला विक्रीसाठी भटारी येथे जात होता. यादरम्यान त्यांचे सुत जुळले. दोघांचेही एकमेकावर प्रेम होते. घटनेच्या दिवशी दुपारी शशिकला व रुपेश हे दोघेही गणेश मिलमिले यांच्या शेतशिवाराकडे गेले. व दोघांनी आपली जीवनयात्रा संपवली. रुपेशचा शव हा विहिरीत तर शशीकला हि विहीरीच्या बाजूला मृतावस्थेत आढळले.

सदर घटनेची माहिती पोंभूर्णा पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले मात्र दि.२८ मे च्या सकाळच्या चार वाजेपर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नव्हते. अचानक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मृतक दोघांचेही मृतदेह फाॅरेन्सीक मेडीसिन टाॅक्सीकोलाॅजी शवविच्छेदनसाठी चंद्रपूरला पाठविण्यात आले. शेवटी दि.२८ मे ला दुपारी ३ वाजताच्या दरम्यान दोघांचेही शवविच्छेदन करण्यात आले. मात्र पोंभूर्ण्यात शवविच्छेदन न झाल्याने घटनेला एक वेगळे वळण मिळाले आहे. सदर घटना हि आत्महत्या आहे की हत्या याचा तपास करणे पोलिसांसाठी आवाहन राहणार आहे. टनेचे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनराज सेलोकर, अंमलदार नैताम, हवालदार राजकुमार चौधरी करीत आहेत.



वरिष्ठ पोलिसांनी दिलेल्या आदेशानुसार पोंभूर्णा येथे शवविच्छेदन न करता चंद्रपूरला दोन्ही मृतदेह हलविण्यात आले. फाॅरेन्सीक मेडीसिन टाॅक्सीकोलाॅजी एक्सपर्ट च्या उपस्थितीत दि.२८ मे ला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान शवविच्छेदन करण्यात आले.


दोघांचे शव हे संशयास्पद आढळून आले असल्याने सदरची घटना आत्महत्या आहे की हत्या यांची चौकशी पोलिसांसाठी आवाहन आहे.पोलिसांच्या चौकशीतून पुढे काय समोर येणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.


शशिकला ही मागील दोन वर्षांपासून आपल्या नवऱ्यापासून विभक्त राहत होती. तर रुपेश हा दिड वर्षांपूर्वी आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतलेला होता असे म्हटले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.