Image Source: SB |
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी सर्वोत्तम बाजी मारली आहे.यंदा मुलांपेक्षा 3.84 टक्क्यांनी जास्त मुलींची टक्केवारी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात तब्बल 2.12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी असून मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे.राज्याचा एकूण निकाल 93.37 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 97.71 टक्के लागला असून मुंबईचा निकाला 91.15 टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला आहे.
नऊ विभागीय मंडळांचा निकाल :
- पुणे - 94.44
- नागपूर - 92.12
- छत्रपती संभाजीनगर - 94.08
- मुंबई - 91.95
- कोल्हापूर - 94.24
- अमरावती - 93.00
- नाशिक - 94.71
- लातूर - 92.36
- कोकण - 97.51
महाराष्ट्र बारावीचा निकाल 2024 कसा तपासायचा:
- बातमी एक्सप्रेसची अधिकृत वेबसाइटवर ( https://www.batmiexpress.com/p/hsc-result-2024-live.html) जा आणि Menu / होमपेजवरील इयत्ता 12वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा रोल नंबर आणि/किंवा नोंदणी क्रमांक टाका.
- बॉक्समध्ये तुमच्या आईचे नाव लिहा (उदा. आईचं नाव Usha)
- तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
- भविष्यातील वापरासाठी निकाल पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.