वडसा (गडचिरोली) :- आंबे तोडण्यासाठी गेलेल्या एका 64 वर्षीय इसमाचा आंब्याच्या झाडावरून पडून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक- 20 मे रोजी वडसा तालुक्याच्या कोंढाळा येथे घडली. मृताचे नाव तुळशीदास शेंडे अस आहे.
सविस्तर वृत्तात असं आहे कि, 20 मे म्हणजे सोमवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास तुळशीदास शेंडे व इतर दोघेजण शेतावर आंबे तोडण्यासाठी गेले होते. तुळशीदास हे आंबे तोडण्यासाठी झाडावर चढले असता; झाडावरून पाय घसरल्याने ते झाडावरून पडले. त्यात त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव तसेच शरीरावर जबर मार लागल्याने जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान घरी आणण्यात आले. त्यानंतर तुळशीदास यांचे स्वास्थ्य बिघडू लागल्याने त्यांना उपचाराकरिता वडसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर उपचार करतेवेळी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान तुळशीदास शेंडे यांची प्राणज्योत रुग्णालयातच मावळली. तुळशीदास यांच्या पश्चात मुलगा,सून, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.तुळशीदास शेंडे यांच्या मृत्यूने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.