तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर: मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,

 

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,

Ø  मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा

चंद्रपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 अंतर्गत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान केल्याचा सेल्फीरिल्स्पोस्टर्स आणि मिम्स् स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यात सहकार्य केले. या स्पर्धांचा निकाल जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ च्या माध्यमातून नुकताच घोषित करण्यात आला आहे.


सन 2019 च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी असल्यामुळे यावर्षी 2024 मध्ये मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह निर्माण व्हावालोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढावीया उद्देशाने स्वीप अंतर्गत जिल्हा प्रशासनाने वेगवेगळे उपक्रम राबविले. तरुण मतदारांमध्ये रिल्स्पोस्टर्समिम्स् बाबत असलेली प्रचंड उत्सुकता पाहता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी माय व्होट इज माय फ्युचरपॉवर ऑफ वन व्होट’ या थीमवर रिल्स्पोस्टर्समिम्स् तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरून अपलोड करणेतसेच तुमचे मत द्या आणि आकर्षक बक्षीसे जिंका’ या थीमवर आधारीत मतदान केल्यानंतर शाई लावलेले बोट दाखवत मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करून फोटो अपलोड करण्याबाबत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.


या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून विजेत्या स्पर्धकांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुढील आठवड्यात नियोजन भवन येथे पारितोषिक वितरीत करण्यात येणार आहे. स्पर्धेचा लकी ड्रा काढतांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपवनसंरक्षक श्वेता बोड्डूउपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे व इतर अधिकारी उपस्थित होते.


हे आहेत स्पर्धेतील विजेते मतदार : 


मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करणे या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक (अपाची मोटरसायकल) सुरेंद्र देवराव पोहाणेरा. तुकुम चंद्रपूर यांनाद्वितीय पारितोषिक (रेसींग सायकल) प्रशांत मधुकर गेडामरा. मूल यांना तर तृतीय पारितोषिक (ॲन्ड्रॉईड मोबाईल) अशोक ऋषी बारसागडेरा. चंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.


रिल्स् स्पर्धा : 


प्रथम पारितोषिक (15 हजार रुपये) आशिष बोबडेरा. टिळक वॉर्डबालाजी मंदीरजवळचिमूर यांनाद्वितीय पारितोषिक (10 हजार रुपये) मंगेश साखरकररा. पालगावपो. आवाळपूरता. कोरपना यांनातृतीय पारितोषिक (5 हजार रुपये) कोमील ज्ञानेश्वर मडावीरा. वॉटर सप्लाय कॉर्टरगोपालनगरतुकुमचंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.


पोस्टर्स स्पर्धा 


प्रथम पारितोषिक (5 हजार रुपये) प्रथमेश यशवंत निकोडेरा. नेहरू नगरनवीन वस्तीडीआरसी रोडचंद्रपूर यांनाद्वितीय पारितोषिक (3 हजार रुपये) आचल राजू धोगडेरा. शासकीय कन्या वसतीगृहभिवकुंड (विसापूर) यांनातृतीय पारितोषिक (2 हजार रुपये) वैष्णवी राजू मिलमिलेरा. तिलक वॉर्डबोर्डाता. वरोरा यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.


मिम्स् स्पर्धा : 


प्रथम पारितोषिक (5 हजार रुपये) येवन संतोष येलमुलेरा. सुब्बईता. राजुरा यांनाद्वितीय पारितोषिक (3 हजार रुपये) संजय बाबुराव सोनुनेरा. हुडको कॉलनीअमर चौकचंद्रपूर यांनातृतीय पारितोषिक (2 हजार रुपये) अनुप रंगलाल शाहारा. मच्छीनालामुक्तीकॉलनीचंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.