कुरखेडा: तालूक्यातील बांधगाव येथे एका 30 वर्षीय विवाहित महीलेचे स्वंयपाक खोलीचा दाराला गळफास घेतलेला मॄतदेह आढळून आले. सदर घटणा आज सकाळी पहाटे सहाच्या दरम्यान उघडकीस आली. मृतक महिलेचे नाव प्रतिभा गिरीधर राणे असे असून कौटूंबिक कलहाला कंटाळत तिने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तिचा मृतदेह आज सकाळी स्वंयपाक खोलीचा दाराला गळफास घेतलेला अवस्थेत आढळून आला. परंतु तीच्या माहेरच्यानी आमच्या मुलीची हत्या करण्यात आली, असा आरोप सासरच्या मंडळी वर केला आहे.
एप्रिल २६, २०२४
0
Read Also:
घटनेची माहीती मीळताच पूराडा पोलीस स्टेशनचा चमूने घटणास्थळ गाठत पंचनामा केला, शवउत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रूग्णालय कूरखेडा अंतर्गत शवविच्छेदन सेंटरला पाठविण्यात आले. मृतकाला पती व २ अपत्य आहेत .यासंदर्भात पूराडा पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आले आहे. घटनेचा पूढील तपास पूराडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भूषण पवार यांचा मार्गदर्शनात सूरू करण्यात आला आहे.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.