वडसा तालुका काँग्रेस बूथ पदाधिकारी मेळावा संपन्न
गडचिरोली :: केंद्रातील भाजप सरकार ज्या हुकूमशाही पद्धतीने वागत आहे, त्याअर्थी देशालतील लोकशाही संपुष्ठात आणून हुकूमशाही प्रस्तापित करण्याचा त्यांचा डाव आहे, सरकार विरोधात जो कोणी बोलेल त्यांच्यावर खोटे आरोप लावायचे, त्यांना त्रास द्यायचा, पक्ष फोडायचे, समाजा समाजात आरक्षनाच्या मुद्याना घेऊन असो किंवा मग जातीय असो की धार्मिक मुद्याना घेऊन तेढ निर्माण करायचा अश्या नितीचा वापर करून आपली सत्ता अबाधित ठेवणे हेच भाजपचे लक्ष आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप सत्तेत आल्यास लोकशाही अस्तिवात असेल काय असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो, म्हुणुन ही लोकशाही च्या रक्षणाची शेवटची लढाई असून काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी लोकशाही टिकविण्यासाठी पूर्ण ताकतीने कार्य करावे असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पदाधिकाऱ्यांना केले आहे.
वडसा तालुका काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित बूथ पदाधिकारी व कार्यकर्ते प्रशिक्षण मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी माजी आम. आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवत, प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, LDM प्रमुख लताताई पेदापल्ली, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, माजी प. स. सभापती परसराम टिकले, माजी उपसभापती नितीन राऊत, रामदास मसाराम, भीमराव नगराळे, NSUI जिल्हाध्यक्ष निशांत वनमाळी, हरबाजी मोरे, राजाराम ठाकरे, महिला तालुकाध्यक्ष पुष्पाताई कोहपरे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पंकज चहांदे, संजय करणकर, दुस्यन्त वाटगुरे, नरेंद्र गजपुरे, मनोहर निमजे, हरीश मोठवानी, सुरेश मेश्राम, जयमाला पेंदाम, रजनी आत्राम, यामिना कोसरे, महेंद्र खरकाटे, जगदीश शेंद्रे, महादेव कुमरे, गीता नाकाडे, टिकाराम सहारे, धर्मराज घोरमोडे, मनोहर खरकटे, रुपलता बोदेले, गीता धांडे, सुरेश खरकाटे,मनोज ढोरे, भूमेश्वर सिंघडे, प्रमोद पत्रे, मोहित अत्रे, सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि बूथ पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.