भंडारा:- शेजारच्या आठ वर्षाच्या बालिकेचे आई वडील कामावर गेल्याची संधी साधून एका १४ वर्षिय मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. दोन दिवसांनी या बालिकेने आईला ही बाब सांगितल्यावर हा धक्कादायक प्रकार पुढे आला. पिडीत बालिकेच्या आईच्या तक्रारीवरून त्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात हा प्रकार घडला.
त्यावरून पिडीतेला सोबत घेऊन आईने लाखनी पोलिस ठाणे गाठून घटनेची तक्रार नोंदविली. घटनेचे गांभीर्य ओळखून लाखनी पोलिसांनी विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेऊन कलम ३७६ (ए,बी) भादंवि तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम-२०१२ चे सहकलम ४, ६, १२ अन्वये गुन्हा दाखल केला. दोघांच्याही वैद्यकीय तपासणीनंतर मुलाची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.