ब्रम्हपुरी: इस्रोच्या अभ्यास दौऱ्यात चमकणार जिल्हा परिषद शाळेची उत्कृष्ट विद्यार्थिनी कृतिका मदन गोपाळ हिची निवड | Batmi Express

Bramhapuri,Bramhapuri News,Bramhapuri Today,Bramhapuri Live,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,

Bramhapuri,Bramhapuri News,Bramhapuri Today,Bramhapuri Live,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,

ब्रम्हपुरी
: ब्रम्हपुरी  (Bramhapuri) तालुक्याच्या टोकाला असलेल्या कोलारी येथे असलेल्या जिल्हा परिषद शाळेची उत्कृष्ट विद्यार्थिनी कृतिका मदन गोपाळ  (Kritika Madan Gopal) हिची इस्रोच्या (ISRO) अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याने संपूर्ण परिसरात कौतुकाचा वर्षाव झाला आहे.

2022-2023 मध्ये कृतिकाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी केली होती, त्यानंतर जिल्हा परिषद चंद्रपूरने कृतिकाची बाल वैज्ञानिक म्हणून निवड केली आहे. तसेच कोसंबी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी सुजल परमानंद शेंद्रे आणि कोलारी शाळेचे प्राचार्य, तोरगाव केंद्राचे प्रमुख एम.ई. खोब्रागडे यांना बंगळुरू येथील इस्रोच्या अंतराळ संशोधन केंद्रातही पाठवण्यात आले आहे.

कृतिका ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत इस्रोच्या अभ्यास दौऱ्यावर असणार आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय तिची आई मनोरमा, वडील मदन गोपाल हुमणे आणि शाळेचे मुख्याध्यापक एम.ई. खोब्रागडे सर, यांना दिल आहे. या महत्वाच्या क्षणी मार्गदर्शक शिक्षक एस.ठाकूर सर, सर्व शिक्षक शव्या, अध्यक्ष जगदीश तलमले, उपाध्यक्ष रुपाली हुमणे, सरपंच कांचन तुपटे, उपसरपंच नूतन प्रधान, यांच्यासह गटशिक्षणाधिकारी माणिक खुणे, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ.विद्या. शेळके यांनी अभिनंदन केले.अभिनंदन केले. कृतिकावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.