Gadchiroli Suicide: एका विवाहितेने मध्यरात्री स्वतःला गळफास घेऊन जीवन संपविला | Batmi Express

Korchi,Korchi News,Gadchiroli,Gadchiroli Suicide,Korchi Suicide,

Korchi,Korchi News,Gadchiroli,Gadchiroli Suicide,Korchi Suicide,

कोरची
: कोरची येथील ग्राहक सेवा केंद्र चालकाच्या पत्नीने मध्यरात्री सांसारीक जीवनाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस झाली आहे. अर्चना रंजीत सरजारे ( वय ३६)  वर्षे रा.कोरची असे मृतक पत्नीचे नाव आहे.

रविवारी सायंकाळी मृतक पत्नी अर्चना, पती रंजीत सरजारे आणि त्यांची एक मुलगी न्यान्सी ५ वर्ष व मुलगा अरमान २ वर्षे हे कोरची शहरातील परिचित व्यक्तीच्या कार्यक्रमातून जेवण करून राहत असलेल्या किरायाच्या खोलीमधील घरात येऊन रात्रीला सर्व मिळून झोपले. तेव्हा मध्यरात्री पत्नी अर्चना झोपेतून उठून एक चिठ्ठीत "मी जे काही करत आहे त्याला फक्त मी जबाबदार आहे याच्यात कुणाचाही हात नाही, मी या जीवनाला कंटाळली आहे. मी गेल्यावर माझा परिवार सुखात राहील ही अपेक्षा आहे. पतीदेवला मी क्षमा मांगते मी तुम्हाला सोडून जात आहे. लेकरांना चांगलं सांभाळाल ही अपेक्षा आहे त्यांना माझी कमी वाटेल. आईचा प्रेम अधुरा राहील तो पूर्ण करून घ्याल प्लीज मला माफ कराल." असे लिहून राहत्या घरातील खोली मधल्या सिलिंग फॅनला ओढणीने गळफास लाऊन आत्महत्या केली आहे.

पती रंजीत झोपेतून पहाटे तीन वाजता उठल्यानंतर बघते तर काय पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने तात्काळ परिसरातील लोकांना व घरमालकाला बोलावून घटनेची माहिती दिली यावेळी दोन्ही मुलांना पकडून पती रंजीत ढसा-ढसा रडायला लागले. परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली घटनेची माहिती कोरची पोलीस स्टेशन येथे देण्यात आली पहाटे पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून चौकशी सुरू केली. यानंतर मृतक पत्नीचे शव कोरची ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेद करून दुपारी तीन वाजता कोचिणारा स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.