गडचिरोली: कोरची तालुका काँग्रेस बूथ पदाधिकारी मेळावा संपन्न | Batmi Express

Gadchiroli,Korchi,Korchi News,Gadchiroli News,Gadchiroli live,Gadchiroli Today,

Gadchiroli,Korchi,Korchi News,Gadchiroli News,Gadchiroli live,Gadchiroli Today,
कोरची तालुका काँग्रेस बूथ पदाधिकारी मेळावा संपन्न 

हायलाईत्स

  • भाजपा शासित राज्यात गुन्हेगारांना प्रोत्साहन --- आमदार अभिजीत वंजारी 
  • विकासाच्या नावावर भाजप सरकार कडून सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल ---- महेंद्र ब्राह्मणवाडे

गडचिरोली:  भाजप सरकार सत्तेत आल्यापासून गुन्हेगारीत वाढ झाली आहे, दिवसाढवळ्या कुठे गोळीबार केल्या जात आहे, तर कुठे गोळ्या घालून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, तरीही सरकार त्यावर कठोर कार्यवाही करत नसल्याने  सर्वसामान्य जनेतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून भाजप सरकार गुन्हेगारांना प्रोत्साहन देत असल्याचे मत आमदार अभिजीत वंजारी यांनी व्यक्त केले.

  कोरची तालुका काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित बूथ पदाधिकारी प्रशिक्षण मेळाव्यात ते बोलत होते.

विकासाच्या नावावर युवक, महिला, कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करण्याचा काम भाजप सरकार करीत आहे. झेंडेपार  खदानीच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या जमीनी बळकविण्याचा कामही भाजप सरकार करीत आहे, असे मत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केले.

 यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा जि. प्र. डॉ. नामदेव किरसान, माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते,  LDM लताताई पेदापल्ली, माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, रामदास मसराम, नगरध्यक्ष हर्षलताताई भैसारे, कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, काँग्रेस नेते हरबाजी मोरे, सदूरूभाई भामानी, हकीमुद्दीन शेख, जगदीश कपूर, राजाराम ठाकरे, रामदास साखरे, वसीम शेख, रामसूराम कोटंगे, परमेश्वर लोहबरे, राजेश नैताम, उद्धव कोरेटी, प्रेमीलाताई काटेगे, महेश नरोटे, धनीराम हिडामी, तुलाराम मडावी, धर्मसाय नैताम, धनराज मडावी, दिलीप मडावी, कौशल्या केवास, नीरा बघवा, सह  मोठया संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.