Big News: हायवा ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तिघे भावंडं जागीच ठार | Batmi Express

Be
0

Accident,Accident News,beed news,beed,Accident News Live,Beed Accident,

बीड
:- वनविभागाची परीक्षा देऊन राहत्या रूमकडे परतणाऱ्या तीन बहीण भावंडांचा हायवाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.८) सकाळी ९.४५ च्या सुमारास बीड वळण रस्त्यावरील बाळापूर फाट्याजवळील एका हॉटेल समोर घडली. हे तिघेही मूळचे जिंतूर तालुक्यातील आहेत. प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे व लखन अंभोरे अशी मृतांची नावे असल्याची माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविकांत दरवडे यांनी दिली.

झाल्टा फाट्याकडून तिघेही भावंडे बाळापूर परिसरातून सातारा-देवळाई भागात असलेल्या रूमकडे परतत होते.

सकाळीच वनविभागाच्या परिक्षेशी संबंधित मैदानी चाचणी देण्यासाठी तिघेही भावंडे दुचाकीवरून गेलेले होते. परतत असताना बाळापूर फाट्याजवळ एक हायवा ट्रक खडीकच टाकून धूळ उडवत ओव्हरटेक करत सुसाट निघाला होता. मात्र पुढे जाताना अंभोरे भावंडांच्या दुचाकीला धडकला.

दुचाकीवरील भावंडे एका बाजूने निघालेले असतानाही मागून येऊन हायवा धडकल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस दाखल झाले.

घटनास्थळी वनविभागाच्या परिक्षेचे प्रवेशपत्र आदी साहित्य विखरून पडलेले होते. त्यावरून पोलिसांना मृत भावंड्यांच्या राहण्याचा पत्ता मिळून आला. मृतांच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार अंभोरे भावंडे हे जिंतूरचे असून येथे सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगरमधील एका हॉटेलच्या मागील बाजू येथे राहायला होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, तिन्ही भावंडांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती
 संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवून चिकलठाणा पोलिसांनी अपघाताची नोंद केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->