 |
खर्रा खाल्ल्याने युवकाचा मृत्यू |
मूल (भेजगाव): मूल (Mul) तालुक्यातील बेंबाळ (Bembal) येथील एका युवकाचा भोवळ आल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २३) दुपारी घडली. मृताचे नाव मल्लेश बिराजी अल्लीवार (२४) असे आहे. खर्रा खाल्ल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची गावात चर्चा आहे. मात्र, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. (Chandrapur Kharra News)मल्लेशने शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर खर्रा खाल्ला. मात्र, थोड्या वेळातच त्याला उचकी आली. त्यामुळे खऱ्याची सुपारी व उलटी श्वसननलिकेत अडकल्याने श्वास घेणे बंद झाले.
कुटुंबीयांनी त्याला दवाखान्यात घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. मल्लेश हा शांत व संयमी स्वभावाने गावातील सर्वांशी चांगले संबंध होते. मल्लेशच्या अचानक जाण्याने कुटुंबावर संकट ओढवले. आज शनिवारी बेंबाळ येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मल्लेश अल्लीवार या युवकाचे पोस्टमार्टेम करण्यात आले. त्यावेळी सुपारी व उलटी झालेले अन्न श्वसननलिकेत अडकल्याचे आढळले. मात्र अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. - डॉ. देवेंद्र लाडे, अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय, मूल
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.