ब्रम्हपुरी: सागवानाच्या झाडाला गळफास घेत एका इसमाची आत्महत्या | Batmi Express

Be
0

Bramhapuri Suicide,Bramhapuri Crime,Bramhapuri Today,Bramhapuri,Bramhapuri Live,,Bramhapuri News,Chandrapur News,Chandrapur,Suicide,
सागवानाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

ब्रम्हपुरी (तोरगाव) :
शुक्रवार, 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास एका व्यक्तीने सागवानाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव येथे उघडकीस आली. राजेश्वर तुकाराम दुपारे (वय 55 वर्षे) रा. तोरगाव खुर्द असे मृताचे नाव आहे. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास नागपूरला जात असल्याचे सांगून मोटारसायकल वरून हा व्यक्ती घरून निघाला होता.

हेही वाचा:- चंद्रपूर: खर्रा खाल्ल्याने बेंबाळ येथील युवकाचा मृत्यू ?

त्यानंतर सायंकाळपर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास तोरगाव (बुर्ज ) येथून मौसी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला त्यांची मोटारसायकल दिसली आणि मयत सागाच्या झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे पो.नि. अनिल इतवार यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हपुरी पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->