वडसा: गांधीनगर येथील तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या | Batmi Express

wadsa,Wadsa news,Wadsa Crime,Wadsa Suicide,Wadsa Today,Wadsa News,Desaiganj,Desaiganj News,

wadsa,Wadsa  news,Wadsa Crime,Wadsa Suicide,Wadsa Today,Wadsa News,Desaiganj,Desaiganj News,

वडसा  (गडचिरोली) :- वडसा (देसाईगंज) तालुक्याच्या गांधीनगर येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज २६ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली असल्याने गावात शंका-कुशंकेला उधाण आले आहे. 

सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील आमगाव-वडसा मुख्य मार्गावरील बैद्यनाथ कारखाना नजिक असलेल्या धोडी नाला जवळच आज सकाळी अंदाजे ७ वाजेच्या सुमारास मार्गावरून ये-जा करणाऱ्या काही नागरिकांना एक इसम झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.त्यामुळे सदर घटना ही वाऱ्यासारखी पसरली व बघ्यांची मोठी गर्दी झाली. त्यानुसार गांधीनगर येथील चक्रधर बनकर यांनी नरेश नामदेव पारधी यांचे मोठे बंधू मारोती नामदेव पारधी यांना सदर घटनेची माहिती दिली.त्यानुसार मारोती पारधी यांनी वडसा (देसाईगंज) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.सदर घटनेची माहिती वडसा (देसाईगंज) पोलीस प्रशासनास कळताच लगेच घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करण्यात आला व मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी वडसा (देसाईगंज) ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.पुढील तपास ठाणेदार किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन करीत आहेत.सदर तरुणाने घेतलेला गळफास गुलदस्त्यात असून लवकरच प्रकरणाचा उलगडा होणार असल्याची चर्चा जनमाणसात सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.