मोहाडी : पोलीस स्टेशन वरठी अंतर्गत येत असलेल्या सोनुली येथे तू प्रेमात पडली अशा संशयावरून भावाने बहिणीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजतादरम्यान उघडकीस जाली, वरठी पोलिसांनी मोठ्या सीताफिने आरोपी आशिष गोपीचंद बावनकुळे (२२) याला अटक केली तर अश्विनी गोपीचंद बावनकुळे (२०) असे मृतक बहिणीचे नाव आहे. बरठी जवळील सोनुली येथील गोपीचंद बावणकुळे हे मुळचे लाखनी येथील रहिवासी होते. काही वर्षाअगोदर ते सासरी सोनुली येथे आले होते. मृतक अश्विनी ही नागपूर येथे बिएससीचे शिक्षण घेत होती.
दोन दिवसाअगोदर ती गावी आली होती. अश्विनी ही गावातील एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. याची कुणकुण भाऊ आशिष याला लागली होती. पाच कारणावरुन दोघा बहिण-भावात नेहमीच चारित्र्याच्या संशयावरुन खटके उडत होते. दि.२४ डिसेंबर रोजीनातेवाईकांकडे लग्न कार्यक्रम असल्यानेव डील हे कन्हान येथे गेले होते. तर आईल ग्न कार्यक्रमानिमित्त साकोलीकडे गेली होती. पटनेच्या दिवशी घरी कोणीच नसतांना प्रेमात पडल्याच्या संशयावरुन दोघा बहिण-भावात कडाक्याचे भांडण झाले. भांडण विकोपाला जाऊन भाऊ आशिष याने तिचा गळा आवळून हत्या केली. कुटुंबियांनी नैसर्गिक मृत्यूचा बनाव करुन तिला वरठी येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. अश्विनीचा मृत्यू संशयास्पद असल्याने याची माहिती वरठी पोलिसांना मिळताच ठाणेदार अभिजीत पाटील यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून प्रेत ताब्यात घेतले. शवविच्छेदनाल अश्विनीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिचा गळा आवळून मृत्यू झाल्याचे निश्पत्र होताच पोलिसांनी या घटनेतील आरोपी नाऊ आशिष याला तत्काळ अटक केली, पोलिसांनी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला, पोलिसांनी आरोपीला दि. २५ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वरठी चे ठाणेदार अभिजीत पाटील करीत आहेत. गोपीचंद बावणकुळे यांच्या कुटुंबात एक मुलगा व एक मुलगी होती. या घटनेत मुलीच्या मृत्यूने व मुलाच्या अटकेनेगोपीचंद बावणकुळे यांच्या कुटूंबावर मोठा आघात पोहचला आहे.
भावाचा मोबाईलवर स्टेट्स
आरोपी भाऊ आशिष याने आपल्या मोबाईलवर आज आमचेकडे अंत्यसंस्कार आहे. असा स्टेट्स ठेवला होता. मोबाईलवर स्टेट्स पाहुन गावातीलच मावशीचा मुलगा धावत आशिष याच्या घरी गेला. तेव्हा समोरील दार बंद होता. मात्र घरातून मोठ्याने गाण्याचा आवाज येत होता. दार ठोठावला असता प्रतिसाद मिळाला नसल्याने त्याने मागेहून दार उघडला. तेव्हा अश्विनीचे प्रेत पडलेले होते. तर आशिष गाणे ऐकत बसला होता.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.