गडचिरोली (Gadchiroli) : खासदार अशोक नेते यांनी ब्रम्हपुरी, वडसा,नागभीड या स्टेशनवर व गडचिरोली येथे अनारक्षित रेल्वे तिकीट ऑफलाइन करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे त्यांची भेट घेत चर्चा करून निवेदनातून करण्यात आली आहे.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रवाशांच्या संबधित अडचणी लक्षात घेता मागच्या आठवड्यापासून सर्व अनारक्षित रेल्वे तिकिटे ऑनलाइन करण्यात आली आहेत. मात्र दरम्यान ब्रम्हपुरी, वडसा,नागभीड येथील रेल्वे प्रशासनाने सर्व तिकीट काउंटर बंद केले आहेत. मात्र, ग्रामीण भागातील प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांना त्यांचे मोबाइल यूटेस ॲप मोबाइल मध्ये डाउनलोड करून रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे तिकीट ऑनलाइन पद्धतीने काढण्यास सांगितले जात आहे.
सर्व रेल्वे तिकीट काउंटरसमोर वेळेवर ऑनलाइन यूटेस ॲपचे बोर्ड लावण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाइलवर व यूटेस अॅप डाउनलोड करून रेल्वेचे तिकीट काढावे लागत आहे. ग्रामीण भागात ही पद्धत अत्यंत अवघड आणि असामान्य आहे, ती नागरिकांच्या समजण्याच्या पलीकडची आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची अडचण दूर करण्यासाठी रेल्वे तिकीट ही ऑफलाइन पद्धतीने पुन्हा सुरू करायला हवं.
तिकीट ऑफलाइन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आणलेल्या यूटेस मोबाइल ॲपचा वापर करावा, याकरिता खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील नागभीड, ब्रम्हपुरी, वडसा या स्टेशनवर व गडचिरोली येथे अनारक्षित रेल्वे तिकीट ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन खासदार अशोक नेते यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
Gadchiroli: MP Ashok Nete has made a demand to make unreserved train tickets offline at Bramhapuri, Vadsa, Nagbhid stations and at Gadchiroli after meeting him and discussing with Union Railway Minister Ashwini Vaishnav.
All unreserved train tickets have been made online since last week in view of the difficulties faced by railway passengers in Gadchiroli-Chimur Loksabha area. Meanwhile, the railway administration at Bramhapuri, Vadsa, Nagbhid has closed all the ticket counters. However, commuters in rural areas are facing many problems. Passengers are requested to download their mobile utes app in their mobile and get the train ticket online from the railway administration.
Timely Online Utes app boards have been installed in front of all railway ticket counters. So you have to download the Utes app on your mobile and buy the train ticket. In rural areas this method is very difficult and unusual, it is beyond the understanding of the citizens. Therefore, to remove the problem of the passengers in rural areas, railway ticketing should be started again in offline mode.
Utes mobile app introduced by railway administration should be used for offline ticketing, MP Ashok Nete met Central Railway Minister Ashwini Vaishnav in New Delhi to start unreserved train ticketing offline at Nagbhid, Bramhapuri, Vadsa stations in Gadchiroli-Chimur Lok Sabha area and at Gadchiroli. Ashok Nete has demanded through a statement.