एकीशी संबंध ठेवून घरोबा दुसरीशी करणाऱ्या तरुणाची तिसऱ्याच घरात अर्थात कोठडीत रवानगी | Batmi Express

Be
0

Crime in Yavtmal,Yavtmal,Yavtmal Crime,Yavtmal news,

यवतमाळ : घरात नवीन नवरी आलेली, पाहुण्यांची वर्दळ आणि दारापुढे पोलिसांची गाडी थांबते. पोलीस दारात बघताच नवरा मुलगा हादरून जातो. त्यानंतर जे घडते त्याने सर्व कुटुंब, नवी नवरी, पाहुणे सारेच संतप्त होतात. या प्रकारानंतर संबंध एकीशी ठेवून घरोबा दुसरीशी करणाऱ्या तरुणाची तिसऱ्याच घरात अर्थात कोठडीत रवानगी करण्यात आली. दारव्हा तालुक्यातील एका गावात ही घटना घडली.

स्वप्नील वानखेडे, असे आरोपीचे नाव आहे. आरोपी स्वप्नीलने एका गावातील अल्पवयीन तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षांपासून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तिच्याशी प्रेमाच्या आणाभाका घेत लग्नाची हमीही दिली. मात्र, १४ डिसेंबरला स्वप्नील दुसऱ्याच तरुणीसोबत बोहल्यावर चढला. ही बातमी कळताच त्याच्यासोबत प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या तरुणीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली व स्वप्नीलविरुद्ध तक्रार दिली.

पोलिसांनी तत्काळ त्या गावात जाऊन दुसरीसोबत नवीन संसाराची स्वप्ने रंगविणाऱ्या आरोपीस ताब्यात घेतले. घरात नवीन नवरी, घरात हळद फिटण्यापूर्वीच आरोपीवर कोठडीत जाण्याची वेळ आल्याने या प्रकरणाची परिसरात चर्चा रंगली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, सुनील राठोड, सुरेश राठोड, 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->