तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

दुचाकीची बैलगाडीला जोरदार धडक, 1 जागीच ठार | Batmi Express

Gadchiroli,Dhanora,Dhanora News,Gadchiroli Batmya,Gadchiroli Accident,Accident,
Gadchiroli,Dhanora,Dhanora News,Gadchiroli Batmya,Gadchiroli Accident,Accident,

धानोरा, (ता.प्र.): बैलगाडी ही रस्त्याच्या कडेला ठेवली होती पण अचानक दुचाकीने बैलगाडीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक तरुण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना तालुक्यातील रांगी येथे बुधवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास घडली. खट्या बोरुले (35) रा. मानापूर असे मृतकाचे तर राजू ठाकरे असे जखमी इसमाचे नाव आहे.

एम.एच. 33 ए.एफ. 7338 क्रमांकाच्या दुचाकीने खट्या बोरुले व राजू ठाकरे बायपास मार्गाने प्राथमिक आरोग्यकेंद्राकडून मानापूरला जात होते. दरम्यान, रांगी येथील संदीप ताडाम यांच्या घरासमोर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेल्या दुचाकीची रस्त्याच्या कडेला असलेल्या रिकामी बैलगाडीला जोरदार धडक बसली.

यात वाहन चालक खट्या बोरुले जागीच ठार झाला तर राजू ठाकरे गंभीर जखमी झाला. गंभीर जखमीला तत्काळ रांगी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.